Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण

339 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण केली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी त्याला मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) तालुका कन्नड या ठिकाणी ही घटना घडली आहे. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब या महिलांनी विचारला असता यावर सामाजिक कार्यकर्त्यानं महिलेला शिवीगाळ केली तसेच मारहाणही केली, असा आरोप महिलांनी केला.

यानंतर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत त्या सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यामध्ये परस्पराविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

Nilesh Lanke

Nilesh Lanke : मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार निलेश लंके यांना प्रदान

Posted by - January 8, 2024 0
पारनेर : स्वातंत्र सेनानी,जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय रेल्वे व अर्थ मंत्री मधु दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिधी या…
Delhi Murder Case

साक्षी मर्डर केसमध्ये मोठी अपडेट; साहिलच्या क्ररतेचा ‘हा’ सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

Posted by - June 2, 2023 0
नवी दिल्ली : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली मर्डर केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन…
Kolhapur News

Kolhapur News : घाम गाळून राहतं घर केलं उभं; अन् त्याच घराने केला घात; कोल्हापूर हळहळलं

Posted by - July 27, 2023 0
कोल्हापूर : राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत…

मुख्यमंत्र्यांचे ठरले ! येत्या ९ एप्रिलला रामल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

Posted by - April 3, 2023 0
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील…

Chandrakant Patil : राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *