Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : दिवाळीचं गिफ्ट अन् मिठाई नेताना काळाने केला घात ! भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

492 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कर्तव्य बजावून पोलीस निरीक्षकांनी दिलेली दिवाळीची मिठाई व भेटवस्तू घेऊन घराकडे निघालेल्या पोलीस शिपायाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे ऐन दिवाळीमध्ये कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे. हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोलवाडी फाट्याजवळ घडला आहे.

काय घडले नेमके?
स्वप्निल महेंद्र अवचरमल (वय 25. रा.हनुमान टेकडी बेगमपुरा) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल हे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. स्वप्निल अवचरमल यांचे वडील महेंद्र यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपातत्त्वावर स्वप्निल हे 5 मे 2019 रोजी पोलीस दलात भरती झाले होते. दरम्यान, एमआयडीसी वाळूज ठाण्यामध्ये ते चालक म्हणून नोकरी करत होते. बुधवारी रात्री आपलं कर्तव्य बजावून दिवाळीची मिठाई व भेटवस्तू घेऊन शहरात बेगमपुरा येथे असलेल्या घराकडे निघालेल्या स्वप्निल यांची दुचाकी गोलवाडी फाट्याजवळ आल्यानंतर एमएच 20 एसटी 4832 क्रमांकाच्या टेम्पोने वळणावर अचानक ब्रेक लावला.

यावेळी पाठीमागून येणाऱ्या स्वप्नील यांची दुचाकी टेम्पोवर धडकली. यामध्ये स्वप्निल दुचाकीवरून बाजूला फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहाय्यक उपनिरीक्षक वेदावाड यांनी स्वप्नील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे अवचरमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत स्वप्निल यांच्या पश्चात आई, सहावीत शिकणारा लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा
Amravati Accident News : एक डुलकी 14 जणांच्या जीवावर बेतली! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

मोठी कारवाई : पुणेकर खात होते भेसळयुक्त तूप ? अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

Posted by - August 11, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर…

पुण्यातील शाळा तूर्तास बंदच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

Posted by - January 22, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील एक आठवडाभर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय एकमतानं झाला असल्याची…

रशियावरील बंदीचा भारतावर परिणाम… ?

Posted by - March 7, 2022 0
युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर टीका होत आहे.अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील…
Weather Update

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Posted by - December 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिचॉंग चक्रीवादाळाचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे देशाता हळूहळू थंडी (Weather Update) वाढताना दिसत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *