Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

431 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरासाठी 2 एप्रिलची रात्र ही काळरात्र ठरली आहे. यामध्ये छावणी परिसरात तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीत दुर्दैवाने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ ही घटना घडली. रात्री तीन वाजेदरम्यान ही घटना घडली आहे.

या भीषण आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकारी, कर्मचारी व छावणी पोलीस आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. मृतांमध्ये दोन बालक, तीन महीला व दोन माणसांचा समावेश आहे. मृतांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

आसिम वसीम शेख ( 3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष ), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष), हमीदा बेगम ( 50 वर्ष), शेख सोहेल 35 वर्ष, रेश्मा शेख (22 वर्ष) अशी या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा…
Sharad Pawar

शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी आयटी इंजिनिअरला अटक

Posted by - June 12, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली…
Sharad Pawar And Devendra Fadanvis

Sharad Pawar : फडणवीसांची माफी म्हणजे…; लाठीचार्जवर पवारांचं मोठं वक्तव्य

Posted by - September 5, 2023 0
जळगाव : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये आगमन होताच त्यांचं (Sharad Pawar) भव्य…
Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जयाप्रदा…
kotwali police

अहमदनगर हादरलं! बायकोची निर्घृणपणे हत्या करून आरोपीची आत्महत्या

Posted by - May 4, 2023 0
अहमदनगर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने पत्नीची निर्घृणपणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *