Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

426 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणाऱ्या एका कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सहा परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 4 जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आपल्या अथक प्रयत्नांनी ही आग विझवली.

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर 216 मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ या कंपनीत ही भीषण आग लागली. या दुर्घटनेत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत पावलेले सगळे कामगार हे बिहार राज्यातील होते. हँडग्लोज बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री ही भीषण आग लागली होती या आगीत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (32), इक्बाल शेख (18), ककनजी (55), रियाजभाई (32), मरगुम शेख (33) यांचा मृत्यू झाला आहे.

या कंपनीमध्ये 15 कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले असे एकूण 18 जण काम करत होते. कंपनीतले बहुतांश कामगार हे बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. मृतांमधील काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. कामगार झोपेत असताना ही आगीची घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Pune News : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ ‘या’ एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन

Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

Marathi Natya Sammelan : 100 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलन शुभारंभ सोहळ्यानिमित्त पुण्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Share This News

Related Post

Reservation Protest

Reservation Protest : बीड हादरलं ! दाम्पत्य आरक्षणाच्या उपोषणातून अचानक उठून घरी गेले; अन्…

Posted by - September 12, 2023 0
बीड : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे (Reservation Protest) पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी एक…
Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया…
Pune Viral Video

Pune Viral Video : थोडक्यात वाचला माय-लेकाचा जीव, पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - August 1, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Viral Video) समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या…
Parbhani News

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Posted by - April 1, 2024 0
पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.…
Ravikant Tupkar

Onion Export Tax : कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या,अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार : रविकांत तुपकरांचा इशारा

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : केंद्र सरकारने कांद्यावर 40 % निर्यात कर (Onion Export Tax) लादून आणखी एक शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *