Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छ.संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव कारचा थरार; जमावाने दगडफेक करत आरोपीला दिला चोप

665 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गांधीनगरात कारने वाहनांना उडवले आणि काही नागरिकांना कट मारल्याचा प्रकार रात्री बाराच्या सुमारास घडला. या प्रकारानंतर जमावाने तुफान दगडफेक करून कारवाल्याला अडवले. रस्त्यावर कार थांबताच संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली, यात चार तरुण गंभीर जखमी झाले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला होता.

काय घडले नेमके?
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारमधून चार तरुण बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बापूनगर परिसरात गेले होते. तिथून काम झाल्यानंतर ते भरधाव वेगात निघाले होते. यावेळी त्यांच्या कारने काही दुचाकींना उडवले आणि वेगाने अरुंद रस्त्यावरून गाडी पळवली. रस्त्यावर सुरू असलेला हा थरार पाहून स्थानिकांनी धाव घेतली. कारचालकाने पुढे काही जणांना कट मारल्यानंतर रहिवासी संतप्त झाले. तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेत शेख इस्माईल शेख इब्राहिम (रा. अल्तमश कॉलनी), वसीम (रा. हुसेन कॉलनी), सय्यद इम्रान सय्यद नसीम आणि अबुझर सय्यद मुमताज अली (रा. बायजीपुरा) हे जखमी झाले.

दरम्यान, काही तरुणांनी कारवर हल्ला केला. त्यावेळी इतरांनी कारमधील चौघांना बेदम मारहाण केली. मध्यरात्री रस्त्यावर अर्धा तास हा प्रकार सुरू होता. दगडफेकीच्या प्रकारामुळे परिसरात अफवा पसरल्याने दोन्ही गटाच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, संतोष पाटील यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Share This News

Related Post

सलमान खानला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरण फेटाळले

Posted by - March 30, 2023 0
पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सलमान खान यांच्या विरोधात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सलमान…
Mumbai Crime News

Mumbai Crime News : दारु देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने थेट पिस्तुलच काढलं; मुंबईमधील पबमध्ये जोरदार राडा

Posted by - October 14, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईत (Mumbai Crime News) एपीएमसी इथं असलेल्या सेवन स्काय पबमध्ये काही ग्राहकांनी राडा घातल्याची घटना समोर…
Deepak Kesarkar

यापुढे सरकारी शिक्षकांच्या बदल्या नाहीत; शिक्षणमंत्री केसरकर यांची मोठी घोषणा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई : सरकारी शळांमधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणार्‍या शिक्षकांच्या…
Latur News

Latur News : सांगवी-सुनेगाव येथे बस – ट्रकचा भीषण अपघात; 29 जण जखमी

Posted by - August 17, 2023 0
लातूर : लातूर-नांदेड (Latur News) राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या…
Manisha Kayande

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *