Chhatrapati Sambhajinagar Accident

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

426 0

छत्रपती संभाजीनगर : वाळुज एमआयडीसीमध्ये आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Accident) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बाईकच्या धडकेनंतर खाली पडलेल्या चौघांना एका अज्ञात वाहनाने चिरडले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्यावर दोन बाईकचा अपघात झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या चौघांपैकी तिघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आकाश शिवाजी कांबळे, कैलास एकनाथ कांबळे, प्रताप साळुबा बनसोडे हे जागीच ठार झाले आहेत. तर शंकर लक्ष्मण थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक या अपघातात मृत पावलेले कैलास आणि आकाश हे दोघेही सख्खे चुलते-पुतणे होते.

करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्यावर या दोन बाईक एकमेकांना धडकल्या होत्या. धडक बसल्यानंतर बाईकवरील चौघेही खाली रस्त्यावर पडले. मात्र याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने आकाश, कैलास आणि प्रताप या तिघांना चिरडले. तर या अपघाता शंकर थोरात हे जखमी झाले. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Share This News

Related Post

Dhangar Reservation

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला (Dhangar Reservation) धक्का देणारा निर्णय दिला…
Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त जमावाने बस पेटवली

Posted by - January 17, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित…

नक्षलवादी हल्ला : महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; दोन जवान शहीद, एक जखमी

Posted by - February 20, 2023 0
छत्तीसगड : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या राजनांदगाव या ठिकाणी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये दोन जवान शहीद झाले असून,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *