Chhatrapati Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

417 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) समोर आली आहे. यामध्ये वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली.

काय घडले नेमके?
लीना पाटील (वय 19 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. मेसच्या पैश्यासाठी गरुडझेप अकॅडमीचा संचालक निलेश सोनवणे सतत लीनासह इतर मुलींचा देखील अपमान करायचा. अनेकदा नाश्ता आणि जेवण न देता अपमान करायचा. विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर ‘ये काळे’ म्हणून हाक मारायचा. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे नीलाने एकदा थेट निलेश सोनवणेला सांगितले होते. त्यावर, ये काळे तू मला शिकवू नको, इतकं माय बापाचं वाटते तर जीव दे, तुझी लायकी तरी आहे का नोकरीवर लागायची, मी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचे ते कर, असे निलेश सोनवणे म्हणाला होता.

या प्रकरणी लीना पाटीलच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले कि, “पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटीलने दीड वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. ज्यासाठी त्यांनी तीन टप्प्यात एकूण 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. तसेच मेससाठी 4500 प्रती महिना भरत होते. कधीकधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनावणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडीलांना फोन करून सांगायची. तसेच जेवण देखील दिले जात नव्हते. मात्र, निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे,” असे म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

Kolhapur News

Kolhapur News : दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत महिला आणि पुरुषांमध्ये जोरदार हाणामारी

Posted by - August 29, 2023 0
कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायने दारुबंदीचा ठराव करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. या (Kolhapur News) सभेत…

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - November 24, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत ८७ लाख ८९ हजार ५२० रूपये…

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ कार्यकर्त्यांने थेट शरद पवारांना लिहिले पत्र

Posted by - April 11, 2024 0
जळगाव : महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यात जमा आहे. पण नाराज असलेल्या उमेदवारांचा आता उद्रेक पाहण्यास मिळत आहे. रावेर लोकसभा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *