Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

510 0

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. आकाश पाल (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो माता चौक येथील रहिवासी आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
माता चौक येथे राहणारा आकाश पाल हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळं कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. यादरम्यान आज कुटुंबियांना एका व्यक्तीने सांगितलं, एक तरुण सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राचीन विहिरीजवळ त्यांना दिसला होता.

कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना मृतदेह तरंगताना दिसला.पोलीस तथा महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने आकाशच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Parbhani News

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह; परिसरात उडाली खळबळ 

Posted by - March 16, 2024 0
Pune: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या…

लालमहालातील ‘त्या’ लावणीच्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड संतप्त

Posted by - May 21, 2022 0
पुणे- पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालामध्ये अलीकडेच एका लावणीचे शूटिंग करण्यात आले. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी या लावणीवर नृत्य करण्यात आले.…
Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

Posted by - October 30, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी…
Sharad Pawar

शरद पवारांच्या एका फोनवर महाराष्ट्रातल्या विद्यार्थांचे वाचले प्राण; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - May 6, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *