Chappal

चप्पल चोरली म्हणून पट्ठ्याने चक्क 3 जणांविरोधात दाखल केली तक्रार

523 0

पुणे : पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा (theft) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.सागर दत्ता चांदणे, आकाश विक्रम कपूर आणि अरबाज जाफर शेख असे गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील खडकी भागात असलेल्या मुस्लिम बँकेच्या समोर फिर्यादी हरेश अहुजा यांचं चपलेचं दुकानं आहे. अहुजा हे रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आरोपींनी रात्रीच्या सुमारास त्यांचे हे चप्पलचे दुकान फोडले. या आरोपींनी दुकानातून तीस बुटांचे तर पंधरा चपलेचे जोड चोरले. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत.

Share This News

Related Post

Ahmednagar Marriage

Ahmednagar Marriage : एक लग्न असेही.. स्मशानभूमीत बांधली लग्नगाठ; अजब लग्नाची राज्यभरात चर्चा

Posted by - July 25, 2023 0
अहमदनगर : लग्न (Ahmednagar Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येक जण आपले लग्न लक्षात राहावे म्हणून काहीतरी…

मद्यप्रेमींच्या पदरी निराशा! राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

Posted by - June 2, 2022 0
कोरोना कालावधीत घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने घरपोच मद्य विक्रीचा निर्णय मागे…

CM EKNATH SHINDE : पीक नुकसानीचे अहवाल तयार ; महाराष्ट्रातील बळीराजाची मदतीसाठी प्रतीक्षा

Posted by - July 28, 2022 0
मुंबई : पावसानं महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी सर्वात जास्त थैमान घातले आहे . महाराष्ट्राच्या या भागातील शेतकऱ्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक…
Uddhav Thackeray

Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक खूप चुरशीची होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचे…

मुंबईच्या श्रेयस अय्यर कोट्यधीश ! श्रेयसवर सर्वाधिक 12.25 कोटीची बोली

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु आहे. यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर कोट्यधीश ठरला आहे. आक्रमक फलंदाजी, मोठे फटके खेळण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *