Car Accident News

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

403 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण (Car Accident News) काही थांबायचे नाव घेईना. जालना रोडवरील रस्त्यावर पोलिसांच्या गाडीला भरधाव वेगात कारचालकाने ओव्हरटेक केले आणि मुकुंदवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चुराडा झाला असून, कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धार्मिक शेखर राणे (वय 23, रा. एन 3, सिडको) असे मृत कारचालकाचे नाव आहे. हा अपघात मुकुंदवाडी रस्त्यावर घडला आहे.

काय घडले नेमके?
जालना ते माळीवाडीकडे कंटेनर क्रमांक (एमएच-2 बीएच-2216) जात होता. रात्री तीनच्या सुमारास कंटेनरचालकाला झोप येत असल्यामुळे त्याने मुकुंदवाडी बस स्टॉप मुकुंदवाडी पोलिस स्टेशन जवळ रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा केला. कंटेनर उभा करून चालक झोपला. त्याच वेळी रस्त्याने रात्री जालना रस्त्याने पोलिसांची गाडी गस्त घालत होती. त्याचवेळी स्कोडा कारचालक राणे भरधाव वेगाने चिखलठाण्याकडून येत होता. कारचालकाने पोलिसांच्या गाडीला कट मारला आणि भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून वेगाने पुढे जात असताना चालकाने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत कारचा समोरील भाग कंटेनरच्या खालपर्यंत गेला. कारचालक राणे याचे डोके कंटेनरवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भरधाव वेगात निष्काळजीपणाने कार चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या धार्मिक राणे याच्या विरोधात पोलिस अंमलदार विकास गुरखेल याच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉयचा खून

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुणे (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनले आहे. सध्या पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सिंहगड रस्त्यावर…
Parbhani News

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह; परिसरात उडाली खळबळ 

Posted by - March 16, 2024 0
Pune: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या…

पतिपत्नीच्या नात्याला काळिमा ! पैशासाठी पत्नीला केले मित्रांच्या हवाली

Posted by - April 4, 2023 0
पैशासाठी पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. या…
Pune Akashwani

पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरुच राहणार !

Posted by - June 15, 2023 0
पुणे : पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री मा.श्री. अनुराग ठाकूर यांनी स्थगिती…
Nashik Crime

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Posted by - November 28, 2023 0
नाशिक : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढतच चालले आहे. नाशिकमधून (Nashik News) अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये चक्क…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *