Buldhana Crime

Buldhana Crime : जीवलग मित्राने केला मित्राचाच घात ! धक्कादायक कारण आले समोर

629 0

बुलढाणा : बुलढाण्यामधून (Buldhana Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये आरोपीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या जिवलग मित्राचा काटा काढला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पळसखेड या ठिकाणी घडली आहे. राजाराम जायभाये असे मृत तरुणाचे नाव आहे तर संतोष थोरवे असे आरोपी मित्राचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राजाराम जायभाये आणि संतोष थोरवे हे एकमेकांचे चांगले जिवलग मित्र होते. त्यामुळे संतोष यांचे राजारामच्या घरी जाणे-येणे होते. त्यातच राजारामच्या पत्नीसोबत संतोषची जवळीक वाढली होती. 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी राजाराम हा संतोषच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेला. मात्र तो घरी न परतल्याने शोधाशोध केली असता राजाराम जायभाये (वय 30) हा संतोष थोरवेच्या शेतात 29 ऑक्टोबरला मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर राजाराम जायभाये यांनी शेतात आत्महत्या केल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली.

मात्र यादरम्यान मृत तरुणाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी राजारामची पत्नी व संतोष थोरवे यांच्या अनैतिक संबंधात राजाराम अडचण ठरत असल्याने संतोष थोरवे यांनीच गळा दाबून राजारामचा खून केल्याची फिर्याद लोणार पोलीस स्टेशनमध्ये दिली. गजानन यांच्या फिर्यादीवरुन लोणार पोलिसांनी आरोपी संतोष मदन थोरवे (वय 34 पळसखेड) याला शिताफीने अटक करून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 302 अन्वये पुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस कर्मचारी संजय जाधव ,नितीन खराडे गणेश लोंढे, ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.

Share This News

Related Post

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Posted by - November 30, 2023 0
सांगली : वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा बुधवारी सांगलीमध्ये पार पडली. या सभेमध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)…
Devendra VS Uddhav

Devendra Fadnavis : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर…. फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Posted by - June 24, 2023 0
बिहारची राजधानी पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं…
Mumbai High Court

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 7 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Posted by - January 3, 2024 0
मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात (OBC Reservation) हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित…
Jalna News

Jalna News : “मी मेल्यावर तू रडशील का?” असे स्टेटस ठेवत तरुणाने अवघ्या 22 व्या वर्षी घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Posted by - August 28, 2023 0
जालना : आजकाल जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे. याचा प्रत्यय देणारी घटना जालनामध्ये (Jalna News) उघडकीस आली आहे. यामध्ये (Jalna…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *