Buldhana News

Buldhana News : मित्रांसोबत पिकनिकला गेला आणि जीवानिशी मुकला

650 0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र वारी भैरवगड या ठिकाणी आडनदी पात्रातील रांजण्या डोहात एका 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिकेत संजय मुरोदे असे मृत तरुणाचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील हीवरखेड येथील रहिवासी आहे. अनिकेत हा वारी हनुमान जवळील रांजण्या डोहात मित्रांसोबत पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

पिकनिक बेतली जीवावर
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वारी हनुमान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे पाण्याचे डोह आहेत. शनिवार आणि रविवारी येथे अनेक पर्यटक पिकनिकसाठी आणि डोहात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येतात. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील अनिकेत देखील रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत वारी हनुमान येथे पिकनिकला गेला होता.

यादरम्यान (Buldhana News) रांजण्या डोहात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. तब्बल 18 तासांनंतर अनिकेतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या दिशेने येत असताना राज ठाकरे यांच्या…
crime

धक्कादायक ! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक…

पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

Posted by - December 30, 2022 0
पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी…

#NEWS DELHI : आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या नव्या महापौर

Posted by - February 22, 2023 0
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी…

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Posted by - June 9, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *