Buldhana News

Buldhana News : ट्रकला ओव्हरटेक करणे पडले महागात; पोलिस कर्मचाऱ्यासह महिला गंभीर जखमी

495 0

बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana News) ओव्हरटेक करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. यामध्ये (Buldhana News) समोर चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना अंदाज न आल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कार मधील पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या सोबत असलेली 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. अरविंद भाऊलाल बडगे (40, रा.खामगाव) असे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

Accident Viral Video: ओव्हरटेक करणे पडले महागात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

काय घडले नेमके?
कोट आगाराची बस (एम एच 40, एन 8276) खामगाव वरून शेगाव मार्गे अकोटकडे जात होती. त्यावेळी शेगाववरून येणाऱ्या अरविंद भाऊलाल बडगे यांच्या कारने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न फसला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या अकोट आगाराच्या बसला कारची जोरदार धडक बसली. जयपूर लांडे फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कारमधील दोघांसह एसटी बस मधील कु.आराध्या सागर शेलोकार (वय 5, रा.अंजनगाव सुर्जी), दीप्ती नामदेव चांदुरकर (वय 14, रा. कुटासा,ता.अकोट), सौ.लता प्रकाश वानखेडे (वय 65, रा. वडनेर गंगई ता.अकोट), रुपाली सागर शेलकर (वय 25, रा. अंजनगाव सूर्जी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघातातील सर्व जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर कारमधील जखमी पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेवर खामगावच्या सिल्व्हर सिटी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अकोला या ठिकाणी हलवण्यात आले आहे. बडगे खामगाव येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या सुनीता खराटे (30, रा. शिवाजीनगर,खामगाव) या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. सुनिता खराटे या अरविंद बडगे यांच्या कोण आहेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Share This News

Related Post

मोठी बातमी : कसबा चिंचवड पोटनिवडणूकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड करणार मदत

Posted by - February 10, 2023 0
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून, आज संभाजी…
Pune Nashik Highway Accident

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक हायवेवर क्रुझरचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Posted by - December 1, 2023 0
पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण (Pune Nashik Highway Accident) अपघात झाला आहे. हा अपघात एवढा…

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

Posted by - February 5, 2022 0
हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा…
NIA

दहशतवादी संघटनांशी कनेक्शन ? कोल्हापुरातील हुपरीत ‘NIA’चा छापा ; दोघे ताब्यात…(VIDEO)

Posted by - August 1, 2022 0
कोल्हापूर (हुपरी) : दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून एनआयएच्या म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात…
Accident News

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Posted by - March 3, 2024 0
रायगड : रायगड जिल्ह्यातील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेद्र दळवी यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *