Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! मुलाच्या खोलीत प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांना बसला मोठा धक्का

798 0

बुलढाणा : बुलढाण्यामध्ये (Buldhana News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मानसिक तणावातून स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. खामगाव शहरातील अनिकट रोड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. आकाश प्रमोद खाकरे (28) याने 13 सप्टेंबरला रात्री राहत्या खोलीत चाकुने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. सकाळी जेव्हा घरचे त्याच्या खोलीत गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून कुटुंबीय हादरले. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत.

काय घडले नेमके?
खामगाव शहरातील अनिकेट भागातील आकाश प्रमोद खाकरे हा युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. दरम्यान काल रात्री त्याने स्वःच्या रूममध्ये जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आपल्या आयुष्याचा शेवट केला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे खाकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मृत आकाशचे काका अजय खाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Share This News

Related Post

Supriya Sule

Supriya Sule : “ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

Posted by - September 23, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या विशेष अधिवेशनात एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे…

आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

Posted by - April 8, 2022 0
गोंडा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या आश्रमात आता आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बहराइच रोडवर…
accident

मध्यप्रदेशमध्ये पुलावरून बस कोसळून भीषण दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू

Posted by - May 9, 2023 0
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – आज सकाळी मध्यप्रदेश खरगोन या ठिकाणी आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक बस…

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

Posted by - April 18, 2022 0
नवी मुंबई- भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला…

प्रसिद्ध संतूरवादक ‘पंडित शिवकुमार शर्मा’ कालवश

Posted by - May 10, 2022 0
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. भारतीय अभिजात संगीतात पं. शर्मा यांचे योगदान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *