Buldhana Accident

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

524 0

बुलढाणा : बुलढाणामधून (Buldhana Accident) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दुचाकी चालवताना मागच्या सीटवर बसलेल्या विवाहितेचा स्पीड ब्रेकवरुन खाली पडून गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. खामगाव नांदुरा मार्गावरील परदेशी ढाबाजवळील पुलाजवळ हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
खामगाव येथील चांदमारी भागातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी शशिकांत शर्मा हे पत्नी सविता यांच्यासह 14 नोव्हेंबर रोजी नांदुरा येथून मुलीची भेट घेऊन दुचाकीने खामगावकडे परत येत होते. नांदुरा रोडवरील परदेशी धाब्याजवळील नवीन पुलाजवळ स्पीड ब्रेकवरुन सदर दुचाकी पडल्याने मागच्या सीटवर बसलेल्या सरिता शशिकांत शर्मा (वय 53) वर्ष या दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला खंबीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खामगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविता शर्मा यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. सविता यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा नातू असा परिवार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

Share This News

Related Post

बीभत्स : केरळमध्ये नरबळी; 2 महिलांच्या शरीराचे केले तुकडे; हत्या केल्यानंतर एवढ्यावरच थांबला नाही तर…

Posted by - October 13, 2022 0
केरळ : आजच्या भारत देशामध्ये अशा घटना म्हणजे भारतीयांच्या भुवया उंचावण्यासारख्याच आहेत. केरळमध्ये झालेल्या या हत्याकांडाने देखील देशाचे लक्ष वेधले…
Saswad Crime

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

Posted by - June 5, 2023 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने…
Manoj Jarange

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 9, 2024 0
बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारनं मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाला मंजुरी दिली.…

नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- मुंबई हायकोर्टाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत नोटीस…

TOP NEWS SPECIAL: महाराष्ट्र केसरी किताबाचे आतापर्यंतचे ‘हे’ आहेत मानकरी ?

Posted by - January 15, 2023 0
राज्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली यात खेडच्या शिवराज राक्षे 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला सध्या त्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *