Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : टायर फुटल्यामुळे बसचा अपघात नाही; RTOच्या अहवालात माहिती उघड

8964 0

नागपूर : आज पहाटेच्या सुमारास (Buldhana Bus Accident) सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) होऊन आग लागल्यानं मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली. यामध्ये 26 प्रवासी मृत्युमुखी पडले. बस मध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस जात होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. या अपघातातून ड्रायव्हर मात्र वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”, समृद्धीवरील अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

या अपघाताप्रकरणी आता आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि बसच्या चालकाने दिलेल्या जबाबात तफावत असल्याचे समोर आले. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे. टायर फुटल्याने हा अपघात झालाच नाही.

या भीषण अपघातातबाबत (Buldhana Bus Accident) अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा अपघात बस चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Related Post

Crime

पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडांची दहशत;गावगुंडांच्या टोळक्याचा वाईन शॉप चालकावर हल्ला

Posted by - February 4, 2024 0
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली असून, स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - January 3, 2023 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन…
ST-Bus

मोठी बातमी ! दोन महिन्यांनंतर एसटीमध्ये सुरु होणार कॅशलेस सुविधा

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या दोन महिन्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात इबी कॅश (Ebi Cash) या…

सर्वसामान्यांचा गृहप्रवेश प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 25, 2022 0
मुंबई : सन 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022 –…
Accident Viral Video

Accident Viral Video: ओव्हरटेक करणे पडले महागात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Posted by - June 26, 2023 0
तामिळनाडूमधील कोइम्बतूरमध्ये एक धक्कादायक घटना (Accident Viral Video) घडली आहे. यामध्ये बापलेकांना अति घाई नडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात वडिलांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *