Bilkis Bano Gangrape

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

611 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिलकिस बानो सामुहिक बलात्कार (Bilkis Bano Gangrape) प्रकरणातील दोषींसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना मिळालेली सूट रद्द केली आहे.

कोर्टाने काय निर्णय दिला?
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, गुन्हेगारांवर ज्या राज्यात खटला चालवला जातो आणि शिक्षा सुनावण्यात येते तेच राज्य दोषींच्या माफीबाबत निर्णय घेण्यास सक्षम आहे. दोषींना माफीचे आदेश देण्यासाठी गुजरात नव्हे तर महाराष्ट्र राज्य सक्षम आहे.

बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे?
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनजवळ साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले होते. या घटनेत अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मात्र संपूर्ण देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. गुजरातमध्ये दंगली उसळल्या. याच दंगलीच्या आगीत बिल्किस बानो यांचं कुटुंब पुरतं होरपळून निघालं. 3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीची आग बिल्किस बानो यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यावेळी 21 वर्षीय बिल्किस यांच्या कुटुंबात बिल्किस आणि त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी यांच्यासह 15 सदस्य होते. चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बिल्किस यांच्या कुटुंबावर 20-30 जणांनी विळा, तलवारी आणि इतर शस्त्र घेऊन हल्ला चढवला. यामध्ये याप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांचा समावेश होता.

बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर ज्यांनी हल्ला चढवला. त्यांनी बिल्किस बानो, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर तीन महिलांवर बलात्कार केला. कुटुंबातील सर्व सदस्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कुटुंबातील 17 पैकी सात जणांचा मृत्यू झाला. तर सहाजण बेपत्ता झाले. हसत्या खेळत्या कुटुंबातील केवळ तीन जणच जीवंत राहू शकले. यामध्ये बिल्किस यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि तीन वर्षाच्या मुलाचा समावेश होता. ही घटना घडली त्यावेळी बिल्किस बानो पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. दंगलखोरांच्या क्रूरतेनंतर बिल्किस बानो सुमारे तीन तास बेशुद्ध पडल्या होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Share This News

Related Post

आसनसोल पोटनिवडणुकीत बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा होणार का बाबू मोशाय ?

Posted by - April 12, 2022 0
कोलकाता- एकेकाळी भाजपमध्ये मंत्रिपद उपभोगलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील…
Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं ! अज्ञात आरोपींकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 27, 2023 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्णीमध्ये एका ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.…

50 रशियन सैनिक मारले, युक्रेनचा मोठा दावा, पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. व्लादिमीर पुतिन म्हणाले की, युक्रेन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने या हल्ल्याचा…
Suicide

धक्कादायक ! पुण्यात सुसाईड नोट लिहून बी.ए.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Posted by - May 15, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने…
Gondia News

Gondia News : गोंदिया हळहळलं ! 3 शिक्षक मित्रांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात मोठी खळबळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *