Satara News

Satara News : साताऱ्यात एसटी आणि बाईकचा भीषण अपघात

837 0

सातारा : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. सातारा (Satara News) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भुरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव वस्तीच्या लवणालगत एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर (38) याचा जागीच मृत्यू झाला. तर यात 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
खटाव – भुरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव वस्तीच्या लवणालगत सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. खटावकडून वडूजकडे निघालेली पुणे स्टेशन-वडूज ही एसटी बस (एमएच 06 एस 8175) आणि वडूजकडून खटावकडे निघालेला दुचाकीस्वार (यूके 05 ए 5559) या दोघांमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर (रा. कुकुडवाड, ता. माण) याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी भीषण होती कि धडकेनंतर एसटी बस पाणी वाहत असलेल्या पाटावरून पलिकडच्या पोपट जाधव यांच्या घराशेजारच्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातात बसच्या केबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या काचा निखळून पडल्या. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी बसच्या चालकाला केबीनमधून बाहेर काढले. तर वडूज येथील प्राथमिक शिक्षक अमोल ढगे, सागर माने तसेच बारामती येथील आरसी ग्रुपचे रोहन चव्हाण, बाळाभाऊ जाधव, भारत चावले, पारस बाबर, अभी खराडे, सौरभ नांदुगुडे, लखन सकट यांनी जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून वडूज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Share This News

Related Post

PUNE CRIME : 100 हुन अधिक घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Posted by - December 23, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर 848/2022 भा.द.वि. कलम 454, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस…

Breaking ! टाईमपास म्हणून सलमानला धमकी दिल्याचे उघडकीस, राजस्थानचा अल्पवयीन ताब्यात

Posted by - April 12, 2023 0
अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन एका राजस्थानच्या…
Kolhapur News

Kolhapur News : घाम गाळून राहतं घर केलं उभं; अन् त्याच घराने केला घात; कोल्हापूर हळहळलं

Posted by - July 27, 2023 0
कोल्हापूर : राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत…

पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

Posted by - March 30, 2022 0
पुणे- देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसात ही आठवी इंधन…
Bhandara Crime

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - December 26, 2023 0
भंडारा : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये सख्या भावाने बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत लहान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *