Maoists News

Maoists News : माओवाद्यांच्या ‘त्या’ बड्या नेत्याला अटक; महाराष्ट्र कनेक्शन आले समोर

244 0

मुंबई : सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला (Maoists News) तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. संजय राव उर्फ दीपक असं या माओवाद्याचं नाव आहे. दरम्यान संजयची पत्नीही माओवादी असून तिलासुद्धा बंगळूरूमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पन्नास लाखांचं बक्षीस होतं.

संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. तो माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देखील आहे. त्याला तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याची माहिती देणाऱ्याला महाराष्ट्रात पन्नास लाखांचं तर इतर राज्यात मिळून दोन कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

संजयविषयी थोडक्यात माहिती
संजय हा महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून, त्याने कश्मीरमध्ये बीटेकचं शिक्षण घेतले. यानंतर तो महाराष्ट्रात परतला. त्यानंतर तो माओवादी चळवळीत सक्रिय झाला. महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे 2015 मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी संजय पोलिसांना चकवा देऊन तिकडून निसटला होता. सध्या संजयकडे कोकणासह पश्चिम घाटात माओवादी चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तो पश्चिम घाट विशेष क्षेञ समितीचा सदस्य आहे. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

Posted by - April 18, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण…

Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

Posted by - August 21, 2022 0
दिल्ली : दिल्लीच्या नव्या एक्साईज धोरणाच्या संदर्भात CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . आज उपमुख्यमंत्री…
Jalgaon News

Jalgaon News : ड्युटीवरून परतलेल्या वन कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - October 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू…
Dhule Bus Accident

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना ! अल्पवयीन मुलीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 1, 2024 0
पुणे : पुण्यातून अजून एक हिट अँड रनची (Pune Accident) घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात हि घटना घडली आहे.…
Tushar Arothe Arrested

Tushar Arothe Arrested : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना अटक

Posted by - March 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *