पुण्यात महिला बाऊन्सरकडून पालकास मारहाण; बिबवेवाडीच्या क्लाईन मेमोरियल शाळेतील घटना

723 0

पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पालक मंगेश गायकवाड (वय 49) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचा आरोप मंगेश गायकवाड यांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

Posted by - March 21, 2022 0
मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत…

अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला, 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.…

आनंदाची बातमी ! नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलली, तारीख कोणती ते जाणून घ्या

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली…

धर्मवीर वाद खोटा; ही भाजप, RSS ची चाल; पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा..! – संभाजी ब्रिगेड

Posted by - January 3, 2023 0
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते हे आम्ही पंचवीस वर्षापासून सांगत आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या बुधभूषण…

पिंपरी-चिंचवड महापालिकेला आली जाग, भोसरीच्या उड्डाणपुलाला १२ वर्षानंतर सुरक्षा कठडे

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *