Crime

भोसरीत कोयता ‘गँग’चा दोघांवर हल्ला ; 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

513 0

पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील दिघी रोडवर कोयता गँगनं एका तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची शनिवारी रात्री घडली. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून संबंधित तरुण जखमी अवस्थेत भर रस्त्यात तडफडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नाच-गाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आम्हीच इथले भाई आहोत, असं म्हणत कोयता गँगनं हा हल्ला केल्याची घटना भोसरीतील दिघी रोडवर शनिवारी रात्री घडली. प्रज्वल गोपाळ मकेश्वर आणि ओमकार नारायण गाडेकर या दोन तरुणांवर हा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात प्रज्वल गोपाळ मकेश्वर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बडगे याच्यासह एकुण अठरा आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - May 18, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain) मोठा फटका बसला आहे, फळ बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता…

यंदा पावसाचे आगमन दहा दिवस आधीच, कधी येणार मान्सून ? जाणून घ्या

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- समस्त देशवासियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा…

‘MITWPU’ चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप

Posted by - November 12, 2022 0
पुणे : “समाजाच्या, देशाच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांना सत्याचा आरसा दाखवण्याचे दायित्व माध्यमांवर आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूजमध्ये न अडकता पत्रकारांनी सत्यनिष्ठतेवर, दुसऱ्यांच्या…

ब्रेकिंग न्यूज ! गुजरातमध्ये मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील मोरबी येथील हलवड भागात एका मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० मजूर अडकले…

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023 0
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *