Bhimashankar Accident

Bhimashankar Accident : भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली गावाजवळ अपघात; 5 जण जखमी

555 0

पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सध्या सुरूच आहे. आज सकाळी भीमाशंकर-कल्याण बसचा गिरवली गावाजवळ भीषण अपघात (Bhimashankar Accident) झाला. भीमाशंकरला जात असतांना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात (Bhimashankar Accident) झाला आहे. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये 5 प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच इतर प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Train Viral Video : महिलांची लोकल ट्रेनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण

या अपघाताची (Bhimashankar Accident) नियंत्रण कक्षाला दूरध्वनीद्वारे माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीदेखील अपघातस्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Jalgaon Crime : दुकानावर जाताना काळाचा घाला; बापाचे छत्र हरपल्याने पोरं झाली पोरकी

या अपघातात (Bhimashankar Accident) दोन रुग्णांना गुडघा आणि घोट्याला किरकोळ दुखापत झाली आहे. कोणालाही कोणताही धोका नाही. सर्व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Amol Kolhe

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Posted by - December 25, 2023 0
शिरूर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांना त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय…

“चोर सोडून संन्याशाला फाशी” पुणे मनपाचा अजब कारभार ! मिळकतकर थकबाकीदाराचा फ्लॅट सापडला नाही म्हणून तिसऱ्याचीच सदनिका केली सील

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या मिळकत कर गोळा करण्याच्या साठी वर्षा अखेर म्हणून जोरदार मोहीम राबविण्यात येते…
Jaipur Express

Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

Posted by - July 31, 2023 0
जयपूर : वृत्तसंस्था – जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात जोरदार पावसाबरोबर येणार ‘हे’ मोठे संकट; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 10, 2024 0
मुंबई : अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रातला बसला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather Update) राज्यात पावसाचा इशारा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *