Beed News

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

702 0

बीड : बीडमध्ये (Beed News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Beed News) गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन प्राध्यापकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या दोन प्राध्यापकांवर नियतीने घाला घातला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, अपघातग्रस्त बाईकने घटनास्थळी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली.

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

काय घडले नेमके?
शहादेव शिवाजी डोंगर आणि अंकुश साहेबराव गव्हाणे अशी या अपघातात मृत पावलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत. घटनेच्या (Beed News) वेळी सकाळच्या सुमारास बीडवरुन शिरूर येथे महाविद्यालयाकडे निघाले होते. यादरम्यान मुर्शदपुर फाट्याजवळ आल्यावर त्यांच्या बाईकला एका कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Ajit Pawar : अनेकांना राजकारणाचे धडे देणारे अजित पवार स्वतः आहेत 10 वी पास !

या अपघातानंतर (Beed News) बाईकने पेट घेतला आणि बाईक जळून खाक झाली. बाईक जळाल्याने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही प्राध्यापकांचे मृतदेह होरपळले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन प्राध्यापकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.

Share This News

Related Post

Molested

Molested : पुण्यात तरुणीची छेड काढल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - June 19, 2023 0
पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीची छेड (Molested) काढत आपल्या काही साथीदारांच्या…

डेंगी, चिकनगुनिया सारखे आजार थोपवण्यासाठी उपाययोजना करा ; सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन

Posted by - September 20, 2022 0
पुणे : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे…
Nashik Ganesh Visarjan

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; 2 जण बुडाले

Posted by - September 28, 2023 0
नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Ganesh Visarjan) निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना…
Raigad Priyanka Sucide

सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; 3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

Posted by - June 3, 2023 0
रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली…
SBI

SBI सह ‘या’ 5 बँकांना एकाचवेळी कोट्यवधींचा गंडा; नेमके काय घडले?

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : तुम्ही जर बँकमध्ये पैसे जमा करून ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या बँकेच्या बाबतीत एक धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *