Viral Video

Viral Video : खिचडी शिजवण्यावरुन दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

3680 0

बीड : बीडमधून एक धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये जोरदार हाणामारी (Viral Video) झाल्याचे दिसत आहे. या दोघीजणी अक्षरशः एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडीओ असल्याचे समजत आहे. दर्जेदार आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचे समजत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. दरम्यान याच शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे सरकारकडून या मुलांना आहार दिला जातो. पण, येथील विद्यार्थ्यांना खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून दर्जेदार आहार दिला जात नसल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार नेहमीचाच झाल्याने येथील एका महिला शिक्षिकेने शनिवारी खिचडी शिजवणाऱ्या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरुन पोषण आहार देण्याची मागणी केली. त्यामुळे याचा संबंधित महिलेला राग आला. त्यामुळे खिचडी शिजवणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली.

यानंतर याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद एवढा वाढला की या दोघींनी एकमेकांचे केस धरले. तसेच मारहाण देखील सुरु केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या, मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दोन्ही हातांनी केस पकडून एकमेकींना लाथा मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी उपस्थित असलेल्या काही गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवली ‘ही’ अट

Posted by - September 12, 2023 0
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. जात बदनाम…
Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून युवासेनेला बळकटी ! ‘या’ 3 शिलेदारांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.…
Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

Posted by - September 14, 2023 0
येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म…

दिल्लीतील कामगिरीमुळे ‘आप’ चा पंजाबमध्ये विजय – शरद पवार

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…
Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

Posted by - July 25, 2023 0
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *