Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

350 0

बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक वळण घेतले आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ केली जात आहे. काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली जात आहेत. तर दुसरीकडे याच आरक्षणासाठी लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. नुकतीच एक बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडच्या पाटोदा तालुक्यातील गांधनवाडीचे ४५ वर्षीय शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच बाळू धारीबा यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News

Related Post

सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दागिन्यांची चोरी, विश्रांतवाडी पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022 0
पुणे – सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला त्याच्या तीन साथीदारांसह विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.…

महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

Posted by - June 29, 2022 0
गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली…
Accident News

Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर

Posted by - May 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडाल्याशिवाय…

‘आम्ही तुमच्या सोबत’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत उध्दव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना धीर

Posted by - October 23, 2022 0
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून…
Sachin Tendulkar

‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती

Posted by - May 30, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे (Clean Mouth Campaign) स्माइल ॲम्बेसेडर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *