Beed Crime

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

1158 0

बीड : बीडमधून (Beed Crime) भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पैशाच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या सैनिक असलेल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
प्रवीण विनायक पवार असे मृत जवानाचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफमध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. काल प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मोठा वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा दुर्दैवाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Related Post

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीच्या आरोपपत्रात अजित पवारांचं नावच नाही

Posted by - April 12, 2023 0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) एक आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी…
Devendra Fadanvis

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Posted by - March 21, 2024 0
अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून…
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा

Posted by - March 18, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना (Chhatrapati Sambhajinagar Crime) समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या…
uddhav thackeray

…तर महाराष्ट्र पेटवून टाकू; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Posted by - May 6, 2023 0
रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच…
Jalna News

Jalna News : शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
जालना : जालन्यामध्ये (Jalna News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *