QR Code Scan

क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान ! तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक

547 0

पुणे : सध्या देशात ऑनलाईन पेमेंटचे (Online Payment) प्रमाण खूप वाढले आहे. देशात क्यूआर कोडद्वारे (QR Code) पेमेंट करण्याचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोक क्यूआरकोडला जास्त पसंती देताना दिसत आहेत. यूपीआय वर आधारित पैसे देण्याची पद्धत लोकप्रिय ठरल्यामुळे सायबर चोरांनी या ठिकाणी आपला मोर्चा वळवला आहे. बनावट क्यूआर कोड लावून लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये हा धोका वाढला आहे. हॅकर्स खरा क्यूआर कोड ऐवजी खोटा कोड चिकटवतात. त्यातून फोन हॅक केला जातो. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणात आपले बँक खाते रिकामे होते. हे सायबर भामटे एवढ्यावरच थांबत नाहीत तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेलदेखील करतात. त्यामुळे या लोकांपासून सावधान राहण्याचा इशारा एफबीआयकडून देण्यात आला आहे. भारत अमेरिकासोबतचं जपान, फ्रान्स ,जर्मनी, नेदरलँड, इत्यादी देशांमध्ये देखील या क्यूआर कोड स्कॅमचा धोका प्रचंड वाढला आहे.

सर्वाधिक क्यूआर कोड स्कॅनिंग प्रमाण कोणत्या देशात किती टक्के आहे ?
अमेरिका 42.2 टक्के
भारत 16.1 टक्का
फ्रान्स 6.4 टक्के
ब्रिटन 3.6 टक्के
कॅनडा 3.6 टक्के

Share This News

Related Post

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच ! गाडी हळू चालवायला सांगितल्यानं कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; गृहविभागाने तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी – रूपाली चाकणकर

Posted by - January 16, 2023 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे अगदी क्षुल्लक कारणांवरून कोयते हातात घेऊन दहशत…

धनुष्यबाण चिन्हाचा आज निर्णय : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 4 वाजता युक्तिवाद होणार सुरू

Posted by - January 17, 2023 0
मुंबई : धनुष्यबाण चिन्हाचा आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर फैसला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी ही सर्वाधिक महत्त्वाची मानली…

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Posted by - April 29, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धनकवडी स्मशानभूमीच्या मागील…

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा

Posted by - November 14, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार आणि…

पुणे, मुंबईसह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

Posted by - April 23, 2023 0
पुणे:  मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *