Robbery News

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

360 0

चंद्रपूर : आपण चित्रपटात अनेक वेळा बँक दरोडे, बँक चोरी आणि बँक फोडीचे प्रकार बघितले असतील. यामधील कथानक कशाप्रकारे बँकेवर दरोडा (Robbery News) टाकण्याची तयारी करते. अगदी बॉलिवूडमधील आँखे चित्रपटापासून ते स्पॅनिश वेब सिरीज असलेल्या ‘मनी हाइस्ट’पर्यंत अनेक सिरीजमध्ये आपण दरोड्याच्या घटना बघितल्या असतील. अशीच एक कथा महाराष्ट्रातील एका बँक शाखेची आहे. अगदी एखाद्या चित्रपटाची कथा होईल अशी या बँकेची कहाणी आहे. महाराष्ट्रात एक अशी बँकेची शाखा आहे जिथे सरासरी दर 2 वर्षांनी बँक फोडली जाते. मागील 14 वर्षात या बँकेची शाखा 7 वेळा फोडण्याचा प्रयत्न झाला. चला तर मग ही बँक नेमकी कुठे आहे? आणि हा नेमका काय प्रकार आहे त्याबद्दल जाणून घेऊया…

नेमकं प्रकार काय घडला?
ज्या बँक शाखेबद्दल आपण बोलतोय ती चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा गावामध्ये आहे. ही शाखा बँक ऑफ महाराष्ट्राची आहे. या शाखेवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षात ही शाखा तब्बल 7 वेळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी झाले तर काही अपयशी झाले. या बँकेची शाखा नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या अगदी शेजारी आहे. त्यामुळेच चोरांसाठी चोरी करुन इथून पळ काढणं सोपं असल्याने ही बँक चोरांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरते.

अशी उघडकीस आली घटना?
या बँकेच्या शाखेच्या शेजारी रहात असलेल्या रमेश ठवरी यांच्या घरातील कुत्रा चोरांच्या आवाजामुळे भुंकायला लागला. कुत्रा भुंकायला लागल्यामुळे कुटुंबीयांना वेगळाच संक्षय आला आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला. रमेश ठवरी यांनी पोलिसांबरोबरच गावातील त्यांचे सहकारी, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांना ही माहिती दिली. पोलीसांना माहिती मिळताच पोलिसांची एक गाडी बँकेकडे रवाना झाली. सर्वांनी बँकेकडे धाव घेताच चोरांनी दरोडा अर्ध्यात सोडून तिथून धूम ठोकली. चोरांनी आपली ओळख पटू नये म्हणून बँकेतील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पळवून नेला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Share This News

Related Post

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस – आशिष शेलार

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे घोडदौड…

भर व्यासपीठावरून शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचे बंडल लांबवले

Posted by - March 30, 2022 0
सांगली – ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल…
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार केले अन्… छत्रपती संभाजीनगर हादरलं !

Posted by - October 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…
Viral Video

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण (Viral Video) वाढतच चालले आहे. रस्ते अपघात हे कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी इतरांच्या चुकीमुळे…
Rahul Eknath And Uddhav

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shiv Sena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *