Bakery Fire

मुंबईतील खारदांडा परिसरात गॅस गळतीमुळे भीषण आग; 6 जण जखमी

252 0

मुंबई : मुंबईतील खारदांडा (Khardanda) परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती (Gas leak) झाली.यानंतर अचानक त्या ठिकाणी आग लागली. ही आग एवढी भीषण होती कि, या आगीमध्ये 6 जण होरपळले आहेत. या 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या 6 जणांमध्ये 2 लहान मुलांचादेखील समावेश आहे. या आगीमुळे बेकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
खारदांडा येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरी (Harishchandra Bakery) आहे. या बेकरीत सकाळी 9 च्या सुमारास अचानक गॅस गळती झाली. त्यानंतर आगीचा भडका उडाला. ही आग एवढी भीषण होती कि या आगीत (Fire) बेकरीमधील सहाजण होरपळले. या सहा जणांना आगीतून बाहेर पडणं मुश्किल झालं. त्यामुळे हे सहाही जण आगीत होरपळले. त्यांना तातडीने वांद्रे भाभा रुग्णालयात (Bandra Bhabha Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या 6 जणांमध्ये 2 लहान मुलांचादेखील समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच बीएमसी, एमएफबी, पोलीस, अदानी आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणलं आणि जखमींना तातडीने बेकरीतून बाहेर काढत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या आगीत होरपळलेल्या सर्व जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व जण 6 ते 65 वर्षाचे आहेत. हे सर्वजण 40 ते 51 टक्के भाजले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

Share This News

Related Post

नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…
Vada Pav

Vada Pav : मुंबईच्या वडापावला सोलापूरचा झणझणीत ‘हा’ वडापाव देत आहे टक्कर? काय आहे स्पेशालिटी

Posted by - June 23, 2023 0
सोलापूर : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये वडापाव (Vada Pav) हा सर्वात फेमस पदार्थ आहे. अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हा वडापाव (Vada…

वाढदिवस साजरा करताना हटकल्याने टोळक्याकडून ज्येष्ठ नागरिकाचा खून

Posted by - June 28, 2022 0
हिंजवडी- वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना शांत राहण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. बावधन…
Maratha Reservation

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Posted by - January 24, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *