Amravati News

Amravati News : अमरावतीमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 20 जण जखमी

605 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चिखलदरा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. एसटी बसमधून 20 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 हून जास्त लोक जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही बस परतवाडा ते तुकईथळ इथं जात होती. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. परतवाडा आगाराची ही बस असून रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह एसटी बसमध्येच अडकले असून ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जवाहर कुंड इथं वळणावर 30 फूट खोल दरीत बस कोसळली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

Maharashtra Politics : ‘त्यांच्याकडे पैलवान तर आमच्याकडं…’; शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांची मोहोळांवर टीका

Manoj Jarange : मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजूनही वेळ गेलेली नाही जरांगे पाटलांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Posted by - April 26, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलासा देणारी बातमी समोर आली…

मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, ठाकरे सरकारला घेरण्याची भाजपाची रणनीती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) मागच्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात…

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया; मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Posted by - January 1, 2023 0
मुंबई: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *