Amravati Accident News

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

380 0

अमरावती : अमरावतीमधून भीषण अपघाताची (Amravati Accident News) घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काय घडले नेमके?
यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण ट्रॅव्हलरमधून जात होते. अमरावतीवरून हे सर्वजण यवतमाळसाठी जात असताना नांदगावच्या खंडेश्वर शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Related Post

Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जयाप्रदा…
Chhatrapati Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - February 22, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) समोर आली आहे. यामध्ये वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप…
Salman Khan

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गुंडांकडून गोळीबार (Salman Khan House Firing Case) करण्यात आला होता.…

#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

Posted by - February 2, 2023 0
पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *