Aalandi News

राजकारण तापलं ! पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट; कोल्हे-भुजबळ संतापले (Video)

590 0

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना काल घडली. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय घडले नेमके?
वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आक्रमकपणे वारकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला.यानंतर पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेवरून आता राजकारण पेटले आहे.

ही घटना अत्यंत चीड आणणारी असून या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. भागवत धर्माची पताका घेऊन चालणाऱ्या आणि अत्यंत शांततेत भक्तीमार्गाचे आचरण करणाऱ्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा खूप मोठा अवमान आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती! अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? शासनाने तातडीने याची दखल घेऊन हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

या प्रकरणी तरुण वारकरी विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर कोणताही लाठीमार झाला नसून, केवळ झटापट झाल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. मात्र तरुण वारकरी विशाल पाटील यांनी पोलिसांचा हा दावा खोडत आपल्या अंगावर झालेल्या जखमा दाखवल्या आहेत. तसंच आम्हा चार वारकऱ्यांना पोलिसांनी बाजूच्या एका घरात नेऊन मारहाण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले ‘मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. जळगाव येथील राहणारा आहे. आम्ही पालखीला दरववर्षी येतो. आम्हाला प्रस्थान सोहळ्याला दरवर्षी सोडतात. मात्र पोलिसांचं अचानक ठरलं की, आम्हाला आत सोडायचं नाही. आम्हा चार वारकऱ्यांना २० पोलिसांनी मारहाण केली. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवरही ते हात उचलू शकतात. पोलिसांनी आम्हाला मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं,’ अशा शब्दांत या तरुण वारकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

Share This News

Related Post

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट

Posted by - May 2, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता तर पुण्याचे जिल्हाधिकारी…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : तरुणांनी दारूच्या नशेत केलेल्या चोरीचे फुटेज पालकांपर्यंत पोहोचताच पालकांनी उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - August 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) उच्चशिक्षित तरुणांचा कारनामा उघडकीस आला आहे. यामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) जालन्यातील आयटीआय आणि डी…

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपला वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू,…

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती

Posted by - March 28, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर एकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजीद मेमन यांनी आता मोदींचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *