Akola News

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

405 0

अकोला : अकोल्यामधून (Akola News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लहान मुलांकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी काय होऊ शकते याचा प्रत्यय तुम्हाला या प्रकरणातून येईल. यामध्ये नाकात तुरीचा दाणा गेल्यामुळे अकोल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील पाटसूल या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल येथे तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घरात आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी त्यांचा नातू योगिराज अमोल इसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले.

त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागओदरच त्याचा वाटेत मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटसूल गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती निधनाची नोंद केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Share This News

Related Post

दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी…

Breaking News : हवेली तहसीलदार तृप्ती कोलतेंवर निलंबनाची कारवाई

Posted by - December 9, 2022 0
पुणे : हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मौजे हडपसर येथील जमिनीबाबतच्या एका गैरव्यवहारा प्रकरणी त्यांच्यावर…
Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. यादरम्यान हवामान खात्याने (Weather Update)…
Heavy Rain

Heavy Rain : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

Posted by - July 26, 2023 0
सातारा : राज्यात सध्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक जिल्ह्यांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *