Akola News

Akola News : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचं महिला पोलिसाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

939 0

अकोला : अकोला (Akola News) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गीता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महिला पोलीस कर्मचारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गीता नगरमधील एका अपार्टमेंटमधील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. वृषाली दादाराव स्वर्गे (वय 35) असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
वृषाली दादाराव स्वर्गे (वय 35) या अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती, त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना विनंती करून बदली थांबवण्यात यावी, असा आग्रह केला. त्यानंतर वृषाली यांना कोतवाली पोलीस ठाण्यात कायम ठेवण्यात आलं. पोलीस दलात ड्युटीवर असताना सर्व काही सुरळीत सुरू होतं. काल 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन करण्यासाठी पोलीस ठाण्यात त्या गैरहजर होते. दरम्यान वृषाली जिथे राहायच्या, तिथे शेजारील लोकांना त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी अनेकदा दरवाजाही ठोठावला मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर शेजारच्यांनी याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वृषाली यांच्या घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. यावेळी वृषाली या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला. यानंतर या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

‘या’ कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल
वृषाली यांचे पती दादाराव स्वर्गे हे पोलीस दलात कार्यरत होते. 2014 मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या जागी वृषाली या पोलीस दलात दाखल झाल्या. दरम्यान 2014 पासून वृषाली एकटीच राहायची, लग्नानंतर त्यांना कोणतेही मूलबाळ नव्हतं, त्यात पतीचे निधन झाले. तेव्हापासून त्या नेहमी तणावात राहायच्या. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांनी एक सुसाईड नोटदेखील लिहिली. यामध्ये त्यांनी पतीच्या निधनानंतर आयुष्यात आज एकटी राहिली आहे. त्यात मूल-बाळ पण नाहीये, जगावं तर कोणासाठी? त्यामुळे आज माझ्या इच्छेने ‘मी’ आपलं जीवन संपवत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत म्हणजे जबाबदार ठेवू नका, हे सर्व काही स्वतः करीत आहे असे लिहिले आहे.

Share This News

Related Post

मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

Posted by - April 23, 2022 0
आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान…
Jalna Muncipality

Jalna Municipality : जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका; राज्य सरकारची घोषणा

Posted by - May 10, 2023 0
जालना : जालना नगरपालिकेचे (Jalna Municipality) रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. त्यामुळे जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका असणार आहे.…

‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’ गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार…
Murder

दौंड हादरलं! तृतीयपंथीयाची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या

Posted by - June 10, 2023 0
दौंड : वरवंड या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका तृतीयपंथीयाचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी…
Hingoli Accident

Hingoli Accident : गणेशभक्तांवर काळाचा घाला ! संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला जाताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 2, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनासाठी जाणे 2 जणांना महागात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *