Samruddhi Highway

Samruddhi Highway : विशेष सरकारी वकिलांचा समृद्धी महामार्गावर अपघात

2846 0

नाशिक : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांची मालिका काही कमी होताना दिसत नाही आहे. यादरम्यान आता विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा नाशिकमार्गे प्रवास करत होते. दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांची गाडी समोरच्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.

Share This News

Related Post

Marathi Sahitya Sammelan

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

Posted by - December 16, 2023 0
अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे (Marathi Sahitya Sammelan) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी…
Sad News

Sad News : ट्रॅकवरून पायी जाताना महिलेच्या हातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं; ठाकुर्ली स्थानकाजवळील घटना

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : आज मुंबईमधील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना (Sad News) घडली आहे. यामध्ये अंबरनाथ लोकल वाहतूक…

Boycott Liger trends on Twitter : ‘Self-Made’ स्टारला पाठिंबा न दिल्याबद्दल विजय देवेराकोंडाच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना फटकारले

Posted by - August 20, 2022 0
ट्विटरवर ‘बॉयकॉट लायगर’ हा नवीन ट्रेंड सुरु आहे. विजय देवेराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटाला ट्रॉलर्स…

‘लेडी डॉन थेरगाव क्वीन’च्या विरोधात गुन्हा, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई (व्हिडिओ)

Posted by - February 1, 2022 0
पिंपरी- सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिवीगाळ करून सर्वसामान्य नागरिकांना धमकावणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या लेडी डॉन थेरगाव क्वीन आणि तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *