Ahmednagar News

Ahmednagar News : शाळा उघडताना गेट अंगावर पडून 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू

498 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात शाळा उघडताना ही घटना घडली. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे.

काय घडले नेमके?
आज शनिवारी (14 ऑक्टोबर) सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थी बाहेर जमले होते. शनिवारी सकाळची शाळा असते. त्यामुळे परिसरातील गावांतून सकाळीच विद्यार्थी आले होते. बस पहाटेच असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधीच शाळेत येतात. त्यानुसार पांडुरंग सदगीर हाही आला होता. शाळा उघडण्याची वेळ झाल्यानंतर काही विद्यार्थी गेट उघडण्यासाठी गेले. तर काही विद्यार्थी गेटमधून आत प्रवेश करण्यासाठी पुढे गेले होते. यादरम्यान अचानक गेट उघडत असताना ते तुटून खाली पडले. गेट पडताना पाहून काही मुले तेथून पळाल्यामुळे वाचली.

मात्र, पांडुरंग बाळु सदगीर हा दहावीतला विद्यार्थी गेटखाली दबला गेला. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही. त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता येत नव्हते. शिवाय गेट पडल्याने मुले घाबरली होती. त्यानंतर शिक्षक आणि मुलांनी मिळून गेट उचलले. तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत बबलु सदगीर हा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

Top News Marathi Logo

खुशखबर ! येत्या 22 मार्चपासून पुन्हा सुरू होणार रेल्वेचा मासिक पास

Posted by - March 18, 2022 0
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पुणे-मुंबई  रेल्वे मासिक पासची सेवा बंद आहे. मात्र सद्यस्थितीला कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. दुसरीकडे…

‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

Posted by - June 1, 2022 0
पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न…

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खाड्यांमुळे असुविधा होतेय ? या टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रार

Posted by - September 29, 2022 0
पुणे : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख…
CM EKNATH SHINDE

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Posted by - April 5, 2023 0
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली असून सततचा पाऊस आता नैसर्गिक…
Mhada

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा देणारा निर्णय म्हाडाकडून (MHADA) घेण्यात आला आहे. मुंबईतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *