Ahmadnagar Crime

जमिनीच्या वादावरून सुट्टीवर आलेल्या जवानाला अन् कुटुंबियांना गावगुडांकडून मारहाण

1533 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या घरावर काही गावगुंडांनी हल्ला केला आहे. त्यांनी त्या जवानाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण (family brutally) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडी येथील राजस्थान बिकानेर 66 मधील तोफखाना युनिटवर कार्यरत असलेल्या जवान महेश गोरक्ष वाघ यांच्यावर हा हल्ला (Beaten) करण्यात आला आहे. गावातील गुंडांनीच हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महेश वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने महेश वाघ यांच्यावर हा हल्ला (Land Dispute) करण्यात आला.

काय घडले नेमके?
वडिलोपार्जित 79 गुंठे जागा ही महेश वाघ यांच्या वडिलांच्या नावावर आहे. सदरचा इसम त्रास देतो म्हणून महेशच्या वडिलांनी या जमिनीतून 45.15 फूट जागा त्याच्या नावाने करून दिली. मात्र, जमीन देऊन सुद्धा त्या इसमाने 3 गुंठ्यावर अतिक्रमण केले. याचा जाब विचारण्यासाठी महेश वाघ यांच्यावर गावगुंडांनी हल्ला केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - December 12, 2023 0
पुणे : राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची…

देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉंबचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची माहिती

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे…

पुण्यातील धक्कादायक घटना : “मला सोन्याचा खजिना सापडला आहे…!” असं सांगून विवाहित असलेल्या प्रेयसीला घेऊन गेला, आणि केले क्रूर कृत्य ….

Posted by - January 11, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका विवाहित प्रेयसीला तिच्या प्रियकराने आपल्याला सोन्याचा खजिना सापडला आहे, असे…

 अजरामर गाण्यांमुळे लतादीदी सदैव आपल्यासोबत असतील

Posted by - February 6, 2022 0
संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली…

दापोली रिसॉर्ट प्रकरणी विभास साठे यांच्या जीविताला धोका, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- दापोली रिसॉर्ट प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *