Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नीचा अडथळा; हत्येचा कट रचला आणि..

661 0

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar News) शहरातील श्रीगोंदा या ठिकाणाहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा पतीनेच खून केला आहे. या प्रकरणी आरोपी पती ज्ञानदेव आमटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
पारगाव येथील ज्ञानदेव पोपट आमटे याचे गावातीलच एका महिलेशी बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या बेकायदेशीर प्रेम संबंधाची पत्नी रुपाली आमटे वारंवार चौकशी करत असल्याचा रागातून ज्ञानदेव याने स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण केली. यानंतर शांत डोक्याने कट रचून त्याने आपल्या पत्नीचा खून केला. यानंतर त्याने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत रूपालीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराजवळ खड्डा करून ज्ञानदेवने पुरला. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन मी स्वतः मयत पत्नी रूपालीला चारचाकी गाडीत घेऊन शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये सोडले होते. नंतर तिला घेण्यासाठी पुन्हा आलो असता ती बेपत्ता झाली, अशी तक्रार त्याने पोलिसांत दाखल केली होती.

याबाबत आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरुद्ध याच्यावर पत्नी रूपालीच्या खुनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी भादवी कलम 302 व 201 नुसार मयत रुपाली हिचा भाऊ रोहित संतोष मडके याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे हा फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी आपले पथक पाठवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेरे करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

Ganpati Making

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तिकार, कारागिरांसाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर !

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : आता अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याने नागरिकांनी पर्यावरण…

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Posted by - March 27, 2024 0
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर (Vanchit Bahujan Aaghadi) सातत्याने बैठकींचं…
Pune News

Pune News : खळबळजनक ! जनता वसाहतमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 रिक्षा जळून खाक

Posted by - September 17, 2023 0
पुणे : काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जनता वसाहत (Pune News) या ठिकाणी 2 खळबळजनक घटना घडल्या. यामध्ये काल राञी 12…
Anil Parab

Anil Parab : पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेचे पाडकाम कारवाईत मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील हे सहभागी होते.त्यामुळे…

लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ पाहणे आजोबांना पडले महागात

Posted by - March 31, 2023 0
व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला.नग्न होण्यास भाग पाडलं आणि नंतर व्हिडीओ कॉलचे स्क्रीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *