Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं! दरोडेखोरांनी पतीला दिला गळफास, अन् पत्नीसोबत…

90440 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एकाची ओढणीच्या सहाय्याने हत्या देखील केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके?
श्रीरामपूरच्या एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी घरात घुसून एका विवाहित युवकाची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली आहे. नईम पठाण असे 33 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मृत नईमची पत्नी रात्री लघुशंकेला घराबाहेर आली असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी तिला फरफटत घरात आणून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होताच, दरोडेखोर घरात आल्याचे नईमच्या लक्षात आले. मात्र काही करायच्या आतच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांच्या झोक्यासाठी बांधलेल्या ओढणीने गळफास दिला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली.

यानंतर या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून सात लाख रुपये आणि सोने-चांदी असा ऐवज लंपास केला. धक्कादायक म्हणजे या आरोपी दरोडेखोरांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धक्कादायक ! भीमा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 8, 2023 0
पुणे : पुण्याच्या दौंडमधून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. भीमा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला…

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत असणं एक विशेष अनुभव आहे – अमित शाह

Posted by - September 5, 2022 0
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी लालबागच्या राजासह मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या…
Thane Accident

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
ठाणे : ठाण्यातील भिवंडीमधून (Thane Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळच्या सुमारास एका ऑटो रिक्षाचा अपघात…
Badlapur News

Badlapur News : काय सांगता! चक्क नगरपालिकेचे उद्यान गेलं चोरीला

Posted by - October 20, 2023 0
बदलापूर : बदलापूरमधून (Badlapur News) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. बदलापूर शहराच्या मध्यभागी वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूला…
Pune News

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 22, 2024 0
पुणे : पुण्यातील वाघोली या ठिकाणाहून (Pune News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *