Advay Hire

Advay Hire : ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अटक; कोण आहेत अद्वय हिरे?

477 0

नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँक फसवणूक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना अटक करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांना मालेगाव सत्र न्यायलयाने 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे. चला तर मग हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊया….

काय आहे नेमके प्रकरण ?
अद्वय हिरे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन असताना त्यांनी त्यांची आई चेअरमन असलेली रेणूका देवी सोसायटीची कमी किंमत असलेल्या एकाचं मिळकतीवर तीन वेळा एकूण 7 कोटी 42 लाख कर्ज दिले. त्यामुळे त्यांनी अप्रमाणिक हेतूचा प्रकार केल्याचा आरोप होऊन त्यांच्याविरुद्ध जिल्हा बँकेने मालेगाव येथील रमजानपूरा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अव्दय हिरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मालेगावच्या अपर जिल्हा सत्र न्यायलयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो नामंजुर केल्यानंतर हिरे यांनी सदरहू निकालाविरुध्द अव्दय हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना भोपाळ येथून अटक केली.

आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी बँकेचे वकील यांनी पोलिसांना आणखी तपास करायचा असल्यामुळे पोलीस 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती तर त्याला हिरे यांच्या वकिलाने 2018 साली दाखल होऊन तपास पूर्ण झाल्याचे म्हणतं पोलीस कोठडी देण्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोण आहेत अद्वय हिरे?
अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत
त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे
शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते
शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची ओळख

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Nagpur Accident

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Posted by - December 16, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. नागपूरमधून (Nagpur Accident) अशीच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.…

हनुमान जयंतीच्या प्रसादातून ५० जणांना विषबाधा, दोघे गंभीर, नाशिक जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव…

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

Posted by - July 8, 2022 0
पुणे: पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून…
Sex Racket

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

Posted by - April 10, 2024 0
पिंपरी – चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली चालविला जाणारे सेक्स रॅकेट पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उध्वस्त…

#PUNE : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर तरुणाचा अंत विजेचा धक्का लागून नाही ! महावितरण अहवालानुसार …

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *