Accident News

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

401 0

रायगड : रायगड जिल्ह्यातील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेद्र दळवी यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर मोटार सायकल व आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
आमदार महेंद्र दळवी हे मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी येत असताना आज माणगाव येथील जासीम अब्दुल रहेमान पासवारे हे आपली हीरो होंडा पॅशन दुचाकीवरुन माणगावकडे जात होते.आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोलनाक्यावर आमदाराची गाडी व मोटार सायकल यांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

या अपघातानंतर तातडीने जखमी दुचाकीस्वार जासीम अब्दुल रहेमान पासवारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये आमदार महेंद्र दळवी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, पुण्यातील गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात…

Pune Crime News : चोरीची 9 वाहने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश ; 4 लाख 50 हजारची वाहने जप्त

Posted by - July 14, 2022 0
पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर दुचाकी वाहन चोरीला आळा बसावा…

कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

Posted by - March 17, 2024 0
कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे शहर…

CHANDRASHEKHAR BAVANKULE : बारामतीच्या विजयासाठी वचनबध्द व्हा

Posted by - September 6, 2022 0
बारामती : बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा…

#MURDER : दिल्लीमध्ये पुन्हा भयंकर हत्याकांड ! पुन्हा तरुणीची हत्या, फ्रिजमध्ये लपवला होता मृतदेह…

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरला होता. तिच्या प्रियकराने तिची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *