Accident News

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

389 0

जळगाव : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र त्या अगोदर एक दुर्दैवी घटना (Accident News) समोर आली आहे. चाळीसगावच्या हिरापूर जवळील रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचं काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरने मालवाहू पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही वाहनं रस्त्यावर उलटली. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात दोन परप्रांतीय मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य मजूर जखमी झाले.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव रस्त्यावर हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ ही घडली आहे. होळीसाठी गावी जाण्याकरत हे मजूर डंपरने भुसावळ येथे जात होते. तिथून ते रेल्वेने आपल्या गावी जाणार होते. हिरापूरजवळ तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम सुरू आहे. या ठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजूर काम करत होते. तिसऱ्या रेल्वे लाइनचं काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा हिशोब झाल्यावर हे मजूर त्यांच्या गावी निघाले होते. ते भुसावळ येथून कटनी पॅसेंजरने गावी जाण्यासाठी डंपरने रेल्वे स्टेशनकडे निघाले होते.

मात्र त्याअगोदरच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. घटनेत जखमी झालेल्या 14 लोकांवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 8 गंभीर मजुरांना धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

बीड : अंबाजोगाईत ट्रक-जीपचा भीषण अपघात; सात प्रवासी जागीच ठार

Posted by - April 23, 2022 0
बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले…
Murder Video

Murder Video : नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत भर बाजारात केली बायकोची हत्या; भयंकर व्हिडिओ आला समोर

Posted by - August 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या संगरूरमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये एका व्यत्तीने त्याच्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले…
Mumbai Pune Express Way

Mumbai Pune Express Way: ‘या’कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प!

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर…
Accident Video

Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर

Posted by - January 21, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधील (Accident Video) कागल तालुक्यातील मौजे सांगाव या ठिकाणी घोडागाडी शर्यतीवेळी मोठा अपघात झाला. घोडा गाडी शर्यतीत घोड्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *