Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

557 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची (Abhishek Ghosalkar Firing) काल रात्री दहीसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोनाने त्यांच्यावर गोळीबार केला. मॉरिसने अभिषेक यांना आपल्या कार्यालयात बोलावून फेसबुक लाइव्हवरच त्यांची हत्या केली. पण अभिषेक यांना धोक्याचा इशारा मिळाला होता. जर त्याला त्यांनी गांभीर्याने घेतलं असतं तर कदाचित त्यांचा आज जीव वाचला असता.

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोना यांच्यात जुना वाद होता. हा वाद मॉरिसच्या मनात खदखदत होता. तो अभिषेक यांचा बदला घेण्याची संधी पाहतच होता. तीच संधी त्याला मिळाली. शुक्रवार 8 फेब्रुवारी, 2024 चा दिवस. ज्या दिवशी आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा होता. बहुतेक कार्यकर्ते या दौऱ्यावर गेले होते. अभिषेक घोसाळकर यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकरसुद्धा आदित्य ठाकरेंच्याच या कार्यक्रमात होते.

यादरम्यान इतक्या वर्षांचं वैर असताना मॉरिसने अभिषेक यांना मैत्रीचा हात पुढे केला. त्यानं आपल्यातील वैर संपलं, आपण जनतेच्या कल्याणासाठी एकत्र आलो हे एकत्र फेसबुक लाईव्हवर सांगायचं असं, मॉरिसने अभिषेक यांना सांगितलं. हे फेसबुक लाइव्ह मॉरिसच्याच कार्यालयात झालं. मॉरिसने जेव्हा अभिषेक यांच्याशी मैत्री केली आणि त्यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. तेव्हा अभिषेक यांच्या साथीदारांनी त्यांना सावध केलं होतं. अभिषेक यांचे साथीदार मॉरिसवर विश्वास ठेवून त्याच्या कार्यालयात जाऊ नको, असं सांगत होतं. पण अभिषेक यांनी त्यांचं ऐकलं नाही. ते मॉरिससोबत त्याच्या कार्यालयात गेले. मॉरिसला फेसबुक लाइव्हचं व्यसन होतं. त्यामुळे फेसबुक लाइव्हवरच त्याने अभिषेक यांची हत्या केली. त्यांच्या मृत्यूचा त्यानं लाइव्ह इव्हेंट केला.

मॉरिसने यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या.घोसाळकर यांच्या छातीत डाव्या बाजूला आणि जांघेमध्ये गोळी लागली होती अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. धक्कादायक म्हणजे घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. मेहूल पारेख आणि रोहित शाहु उर्फ रावण अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल…
Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेत 6 कारचा चुराडा

Posted by - December 23, 2023 0
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये दोन ट्रकच्या अपघातामध्ये…
Jalgaon News

Jalgaon News : पावसाने केला घात ! सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 27, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतात काम करत असताना…

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - March 19, 2022 0
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *