Crime

पुण्यात भर रस्त्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; पाहा, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ

381 0

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज रोज व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती एकमेकांना मारत असून यातील एकाने दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

ही घटना पुण्यातील चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किशोर धोत्रे आणि शंकर मिरेकर अशी या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार किशोर धोत्रे आणि शंकर मिरेकर हे नातेवाईक आहेत. धोत्रे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय शंकर मिरेकर याला होता. त्याच रागात मिरेकर याने धोत्रेला भर रस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या दोघांमध्ये बराच वेळ झटापट झाली. ज्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना घडत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. तर धोत्रेंनी देखील त्याच्या काही साथीदारांना बोलावून मिरेकर याला मारहाण करायला सांगितले असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. दरम्यान या घटनेवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चतु:र्श्रुंगी पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Share This News

Related Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - November 20, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज (रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२) सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.…
Delhi Crime Video

Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना (Delhi Crime Video) समोर आली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरुणाने…
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान; पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक प्रतिष्ठापना

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या…
Congress

Congress : नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

Posted by - October 12, 2023 0
नागपूर : काँग्रेसमध्यल्या (Congress) गटातटाचं राजकारण हे नेहमीच पाहायला मिळत असतं. अनेकदा काँग्रेसमधीलच काही गट एकमेकांचा विरोध करताना दिसत असतात.…
Pune Crime News

Pune Crime News : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे कामगार आणि त्याच्या साथीदाराना फरासखाना पोलिसांकडून अटक

Posted by - January 12, 2024 0
पुणे : दिनांक ३१/१२/२०२३ रोजी रात्री ०८.०० वाजता ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजीचे सकाळी १० वाजताच्या दरम्यान फिर्यादी दिपक माने याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *