Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

842 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने (Sushala Rajendra Kirtane) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हत्येप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक, संदीप बाळासाहेब शिरसाट, सोमनाथ गणपत घुले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमधील शहादेव धायतडक आणि शुभम धायतडक यांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत सुशाला किर्तने यांचा भाऊ बाळासाहेब शिरसाट याचा सोमवारी बडे वाडी या ठिकाणी दहाव्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी सुशाला यांचा शहादेव धायतडक यांच्यासोबत वाद झाला होता. शहादेव धायतडक हा सुशाला यांचा मेव्हणा आहे. दोघा मेव्हण्यांची भांडणे झाल्यानंतर बाळासाहेब हा सुशाला यांच्याकडे किर्तनवाडीला आला होता. सुशाला यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले होते. लग्नानंतरचा रीतिरिवाज असल्याने बाळासाहेब हे बहिणीकडे आले होते.

यादरम्यान बाळासाहेब यांच्या मागे त्यांचा मेव्हणा शहादेव धायतडक, त्याचा मुलगा शुभम धायतडक आणि अन्य चौघेजण हत्यार घेऊन आले. यावेळी त्या ठिकाणी मोठा वाद झाला. राजेंद्र किर्तने आणि सुशाला किर्तने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने शुभमने सुशाला यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. यानंतर सुशाला या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share This News

Related Post

Devendra Fadnavis : ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - August 27, 2023 0
परभणी : परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Pandharpur Temple

Pandharpur News : कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना पुजेचा मान नाही, विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

Posted by - November 8, 2023 0
पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल…
Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Posted by - April 1, 2024 0
पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 30…

धक्कादायक!लॉजवर नेले आणि पत्नीचा खून केला..मित्रांना सांगताच बिंग फुटले

Posted by - June 15, 2024 0
पुणे : घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नी च्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पतीने लाॅज ला कुलूप लावून…
Manoj Jarange

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Posted by - January 28, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *