Rape

हिंजवडी आयटी पार्क हादरलं! नामांकित कंपनीतील सुपरवायझरने हेल्पर महिलेसोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

1019 0

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. अशीच एक घटना हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjewadi IT Park) घडली आहे. यामध्ये हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर तिच्या असाह्यतेचा फायदा घेत तिथल्या सुपरवायझरने तिच्यावर बलात्कार (Rape) केला आहे.

काय घडले नेमके?
हिंजवडी फेज 2 मध्ये 26 मे रोजी ही अत्याचाराची घडली होती. पीडित महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात 13 जून रोजी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. सूर्यकांत गणपती रामनल्ली (Suryakant Ganapati Ramnalli) (वय 34, रा. हिंजवडी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. या आरोपी सुपरवायझरने 26 मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. यानंतर देखील आरोपीने त्रास देणे सुरू ठेवल्याने अखेर कंटाळून पीडित महिलेने बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News

Related Post

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

Breaking News ! रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला मालाडमधून अटक

Posted by - June 2, 2022 0
पुणे- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी मालाडमधून अटक केली आहे. सुधीर लाड असे…

तारकर्ली बोट घटनेत पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2022 0
मालवण- तारकर्ली येथे झालेल्या बोट दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा समुद्रात बुडून दुर्देवीरित्या मृत्यू…

“संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही; छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना संसदेत अमोल कोल्हेंबाबत घडले असे…

Posted by - December 8, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपमान कारक वक्तव्यामुळे वादंग पेटलेला असतानाच खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत संसदेत…

कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3.4 टक्के कमी रुग्ण

Posted by - February 2, 2022 0
नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *