Akola News

Akola News : बायकोन जीवन संपवलं, पतीची पोलिसांना माहिती मात्र, शवविच्छेदन अहवालात ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

67219 0

अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रस बु.या ठिकाणी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना 11 ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. सारिका विकास गवई (वय 27) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. आता सारिकाच्या मृत्यूचा अहवाल समोर आला आहे. आधी सारिकाचा गळा आवळून खून करण्यात आला, त्यानंतर आत्महत्याचा बनाव रचल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

काय घडले नेमके?
11 ऑगस्ट रोजी पातुर तालुक्यातील दिग्रस गावातील सारिका विकास गवई या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशी माहिती तिच्या पतीने चान्नी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. यानंतर या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यादरम्यान आता मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर
या अहवालात विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास सुरू केला. तपासादरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांना तिच्या पतीवर संशय झाला अन् त्यांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सैनिक पती विकास जगन्नाथ गवई (वय 36), दीर सुहास जगन्नाथ गवई (वय 33), सासरे जगन्नाथ दौलत गवई (वय 65) या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन करत आहेत.

Share This News

Related Post

Breaking News

Breaking News ! राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता ‘या’ दिवशी होणार

Posted by - July 31, 2022 0
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली…
Thane Crime News

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 10, 2023 0
ठाणे : ठाणे (Thane Crime News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात…

शिंदे गटाची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव; ‘या’ मागणीने ठाकरे गटाला धक्का

Posted by - April 10, 2023 0
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Maharashtra Politics) प्रचार जोरदार सुरु असताना दुसरीकडे महायुतीने काही जागांवर आपला उमेदवार घोषित केला नव्हता. अखेर…

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्बसदृश्य आवाजाने धमाका; अग्निशमन दलाचे मॉक ड्रिल

Posted by - October 13, 2022 0
पुणे : आज जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रिल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *