Navi Mumbai News

Navi Mumbai News : छाती व श्वसनरोग विभागप्रमुखांना आला हार्ट अटॅक; 25 नामवंत डॉक्टर असतानादेखील कोणालाच वाचवता आले नाही

1207 0

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टरांची परिषद सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी मुंबईतील एका नामवंत डॉक्टराचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी नेरूळ येथे घडली. या परिषदेला 25 हून अधिक नामांकित डॉक्टर उपस्थित होते. मात्र कोणालाच त्यांचा जीव वाचवता आला नाही. यामुळं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
नेरूळ येथील हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी अद्ययावत ज्ञान उपक्रमांतर्गत डी. वाय. पाटील रुग्णालयातील छाती व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभय उप्पे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, ते परिषदेमधून घरी जाण्यासाठी निघाले. परंतु हॉटेलच्या लिफ्टजवळ आल्यानंतर, छातीत जोरदार कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. याची माहिती मिळताच उपस्थित डॉक्टरांनी लिफ्टजवळ धाव घेतली.

यानंतर डॉ. अभय उप्पे यांना सीपीआर देण्यात आला. उपस्थित डॉक्टरांनी ताबडतोब कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून घेतली. डॉ. उप्पे यांना रुग्णवाहिकेत ठेवून उपचार सुरू करण्यात आले. ही रुग्णवाहिका अपोलो रुग्णालयात चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांनी त्यांना वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले मात्र त्यांचा अपयश आले. नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत होत असलेल्या वैद्यकीय परिषदेतच नामवंत डॉक्टरने जीव गमावल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Gujrat News

Gujrat News : गुजरातमध्ये हमसफर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, धावत्या ट्रेनने अचानक घेतला पेट

Posted by - September 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील (Gujrat News) तिरुचिरापल्ली आणि श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर…
Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023 0
मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का…

अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 8, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला विराट सभा घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी…
shinde and uddhav

Supreme Court : अपात्र आमदार सुनावणी प्रकरणी कोर्टाकडून देण्यात आले ‘हे’ आदेश

Posted by - October 30, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.…

पतीला प्रेयसी सोबत राहायचे होते. म्हणून दोघांनी पत्नीचे हातपाय बांधून….

Posted by - April 28, 2023 0
आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *