Pune News

सिलिंडरमधून गॅस भरताना झालेल्या स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

830 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणामाल दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करणे एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले आहे. यामध्ये गॅसगळतीनंतर झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या 15 वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. गीता मन्नाराम चौधरी (वय 15, रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. तसेच या दुर्घटनेत मुलीचे वडील मन्नाराम चौधरी (वय 45) हेदेखील जखमी झाले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
चौधरी यांचे किरकटवाडी भागातील माळवाडी येथे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. किराणा माल दुकानात ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करीत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोदाम भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदा गॅस भरण्याचे काम करत असत. गुरुवारी सकाळी गॅस भरत असताना अचानक गॅसची गळती झाली आणि आगीचा भडका उडाला.

या आगीच्या भडक्यात चौधरी आणि त्यांच्या दोन मुली गंभीररीत्या होरपळल्या. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका मुलीचा सोमवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीवर अजूनही उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : “आता आमच्या सोबत बेडरूममध्ये पण चला…!”; पापाराजींवर सैफ अली खान चिडला…

Posted by - March 3, 2023 0
मुंबई : चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रींचे अनेक चाहते असतात. चित्रपटांमध्ये जे काम केले जाते त्या व्यतिरिक्त आपला आवडता अभिनेता किंवा…

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याने भाविक भयभीत

Posted by - June 9, 2022 0
कराची- पाकिस्तानमधील कराचीमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवतांच्या मूर्तीं भंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविक…

दिल्ली : जॅकलीन फर्नांडिसनंतर नोरा फतेही मनी लॉन्ड्री प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; नोराची दिल्ली पोलिसांकडून सहा तास कसून चौकशी

Posted by - September 3, 2022 0
दिल्ली : तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला तीनच दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात…

Pune Fire : मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून 5 जणांची सुटका

Posted by - March 2, 2024 0
पुणे : काल मध्यरात्री 1.48 वाजता गंगाधाम फेज 02, विंग जी -05 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग (Pune Fire) लागल्याची…

‘पुण्याचे मेट्रो मॅन’ काळाच्या पडद्याआड; शशिकांत लिमये यांचं निधन

Posted by - May 20, 2022 0
पुणे- मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये (वय 71) यांचे गुरुवारी रात्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *