Nashik News

Nashik News : नाशिक हळहळलं ! पोटच्या गोळ्याने आईच्या डोळ्यांदेखत सोडला जीव

9883 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या मुलास शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन येत असताना उड्डाणपुलावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात आईच्या डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने दुभाजकावर पडून आईसमोरच तिच्या 10 वर्षीय लेकाचा करुण अंत झाला आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिन्नर फाटा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

वरद गणेश चिखले असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव असून, या अपघातात त्याची आई संगीता चिखले यादेखील जखमी झाल्या आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या या असंवेदनशील कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पोलिस नाईक अनिल पवार यांनी या अपघातप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रक (एमएच 14 एलबी 0726) चालक अहमद पटेल (रा. कुरकुंडी, पोस्ट घारगाव, ता. संगमनेर) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कसा घडला अपघात?
वरद हा शहर पोलिस दलातील कर्मचारी गणेश चिखले (रा. चेहेडी पंपिंग स्टेशन) यांचा लहान मुलगा होता. तो जेलरोड येथील के. एन. केला शाळेत पाचवीत शिक्षण घेत होता. त्याचा गुरुवारी पेपर होता. पेपर झाल्यावर त्याची आई संगीता चिखले या त्याला शाळेतून घरी घेऊन येत होत्या. उड्डाणपुलावरील सिन्नर फाटा बाजूकडील उतारावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आयशर ट्रकने धडक दिली. त्यामुळे संगीता चिखले या दुचाकीसह दुभाजकावर पडल्या. या अपघातात मायलेक जखमी झाले. वरदच्या पायांसह डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला स्थानिक नागरिकांनी त्वरित सिन्नर फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…

‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद केल्याबाबत मोदी सरकारचा तीव्र निषेध- गोपाळ तिवारी

Posted by - March 18, 2022 0
भारतीय रेल्वेद्वारे ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना केंद्र सरकार  रेल्वे भाड्यात सवलत देत असे. प्रवाशांना दिलेल्या ‘सवलतीचा…

‘औरंगाबाद’चे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर होणार ? चंद्रकांत खैरे यांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 3, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबादच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. मात्र आता शिवसेनेचे माजी…
pune crime

Pune Crime : अजबच ! लग्नास नकार दिल्याने चक्क महिलेने तरुणालाच पळवलं

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) MPSC ची गुणवंत विद्यार्थिनी दर्शना पवारची हत्या एकतर्फी प्रेमातून तिच्याच मित्राने केल्याचा प्रकार समोर आला…
Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - December 12, 2023 0
पुणे : राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *